रस्ता सुरक्षा हा महिनाभराचा सण नव्हे !

Poster 2 2

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आपल्या समाजामध्ये एखाद्या दिवसाचे/ आठवड्यांचे/ महिन्यांचे औचित्य साधून त्या विषयाबाबत साजरा करण्याचे/ पाळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे उदाहरणार्थ Valentine Day, Giving Week, Sexual Assault Awareness Month. नक्कीच असे दिवस/ सप्ताह/महिना पाळण्या बाबत कोणाचा विरोध असू नये. निदान त्या काळापुरते तरी त्या विषयाबाबत लोकांमध्ये जागृती होऊन त्या समस्येची तीव्रता कमी करणे किंवा अपेक्षित परिणाम साध्य करणे शक्य होते. परंतु त्या विषयाचे महत्त्व दिवस/ सप्ताह/महिना दिवसा पुरते मर्यादित नसावे.

रस्ते सुरक्षा या विषयाशी निगडित निगडित, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान पाळला गेला. जसे की शीर्षक दर्शविते भारतात हा ३२ रस्ता सुरक्षा जो महिनाभर साजरा झाला याचा अर्थ असा होतो आपण मागील गेली ३१ वर्ष हे अभियान चालवित आहोत.

या वर्षी देखील पोलीस प्रशासन, परिवहन अधिकारी, विविध सामाजिक संस्था इत्यादी या महिन्याभरात हिरिरिने विविध कार्यक्रम, उपक्रम, नाविन्यपूर्ण कल्पना यांचे आयोजन करीत होते. रस्त्यांवर, चौकाचौकात, विविध सभांमध्ये रस्ते सुरक्षा विषयी फलक दर्शवून जनजागृती करताना दिसले. विविध पातळ्यांवर लोकांमध्ये आणि वाहन चालक साठी वाहतूक नियमांबाबत जनजागृती करताना दिसले. लोकांनी रस्त्यावर शिस्त पाळणे, लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, लोकांमध्ये नियमांबाबत अधिक जागृती आणणे, वाहन चालकाने गाडी सुरक्षित चालविणे अशा प्रकारचे संदेश देण्यात आले. अर्थातच या गोष्टी पाहणे, ऐकणे आनंददायी होते. मनामध्ये समाधान होते की रस्ते सुरक्षा विषयी लोकांमध्ये, समाजामध्ये चर्चा होत आहे विविध व्यासपितावर रस्ते सुरक्षा बोलले जात आहे. रस्ते सुरक्षा ही एक समस्या आहे आणि त्याबाबत आपण काहीतरी करणे हे गरजेचे आहे हा विचार बळावत आहे. समाज या समस्येकडे गंभीरतेने विचार करत आहे.

परंतु आपणास हे लक्षात ठेवावे लागेल रस्ते सुरक्षितते बाबतीत ३० दिवसात जनजागृती वाढवून काहीही साध्य करू शकत नाही. यासाठी सतत आणि जाणीवपूर्वक योग्य दिशेने प्रयत्न करने आवश्यक आहे. जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे पालन करणे, सतत द्रुश्य स्वरुपात नियम उल्लंघन कारवाई, योग्य रस्ता रचना घडवावि लागेल, असुरक्षित घटकाचे ( पादचारी, सायकल स्वार आणि दुचाकी स्वार) संरक्षण करणे हे क्रमप्राप्त ठरवावे लागेल.

रस्ता सुरक्षा समस्याबाबतीत केवळ जनजागृती करून काहीही परिणाम साध्य केले जाऊ शकत नाही. पुण्यातील किती दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे हे माहित असून देखील वापरत नाही हा कुतूहलाचा विषय आहे. समोर लाल सिग्नल जर दिसत असेल तर थांबणे आवश्यक आहे हे किती लोकांना माहीत असून देखिल पाळीतू नाही हे सांगण्यासाठी एखाद्या बुद्धिमानाची गरज नाही. कधी कधी वाहन चालकांना वाहतूक नियमांविषयी माहिती नसते. उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी गाडीला जर दोन्ही बाजूने आरसे नसतील तर पोलीस दंड आकारणी करत होते यामध्ये लोकांना याविषयी काहीच कल्पना नव्हती.परंतु या समस्येचे मूळ कारण भ्रष्ट चालक परवाना यंत्रणेमध्ये आहे जी सहजगत्या दूर केली जाऊ शकते. अभियान राबविण्यात पेक्षा या व्यवस्थेत बदल घडवणे गरजेचे आहे.

बर आता रस्ते सुरक्षिततेच्या बाबतीत लोकांच्या जनजागृती वाढवून ही समस्या कमी करणे तितके समर्पक नाही कारण रस्ते सुरक्षेची जबाबदारी मुख्यत्वे सरकारी संस्था/सरकारी विभागावर अवलंबून आहे. समाजास अनुकूल नियम बनविणे, नियमांची सक्ती अंमलबजावणी करणे, चांगले रस्ते बनविणे, सोयी-सुविधा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच परिसर ही संस्था जिल्हा रस्ता सुरक्षा समितीतील सरकारी भागधारकांसाठी प्रशिक्षण देत आहे. यामध्ये Haddon Matrix, Safe System Approach, relevance of traffic rule enforcement या विषयावर प्रशिक्षणाचा भर आहे.

लोक नियम पाळतील परंतु अपघात हे सामान्य लोकांच्या सामान्य चुकीमुळे होतात हे दुर्लक्ष करून चालणार नाही. मानव चुकीचा पुतळा आहे . तो बहुतेक वेळा अनावधानाने तर काही वेळा जाणीवपूर्वक चुका करतो. चालक प्रत्येक वेळी प्रत्येक नियमांचे पालन करील अशी खुळचट कल्पना करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे. रस्ता सुरक्षा समस्या कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. सरकारी धोरणे, वाहतुकीचे नियम, योजना, आराखडे याकडे सजग बुद्धीने व सर्वंकष पाहणे गरजेचे आहे. वेगमर्यादा, हेल्मेट/ सीट बेल्ट चा वापर, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, सुरक्षित वाहने, रस्ते रचना, इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे. वाहतूक अभ्यासक, रस्ते अपघात कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे याचा आग्रह करत आहेत परंतु त्यासाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी याबाबत सकारात्मक विचार करून योग्य अंमलबजावणी केल्या पाहिजे. इतर देशांतील उत्तम कार्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे उदा. स्वीडन देशात रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी केलेले प्रयोग.

भारतात दरवर्षी साधारण १,५०,००० लोक मरण पावतात. महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी जवळपास १३,००० लोक बळी पडतात. एकूण मृत्युमुखी पैकी ५०% पेक्शा अधिक हे पादचारी, सायकल-स्वार आणि दुचाकी-स्वार आहेत हि कश्या प्रकारे कमि करता येइल हा व्रशभर चिन्तनाचा विशय असायला हवा नव्हे की महिना भराचा.

सतत वर्षभर या गोष्टींचा उहापोह केला पहिजे अन्यथा रस्ता सुरक्षा अभियान केवळ एक महिन्या साठी साजरा केला जाईल आणि वर्षभरातील इतर दिवस “ये रे माझ्या मागल्या” अशीच परिस्थिती राहील.

- संदीप गायकवाड , परिसर

Add comment


Security code
Refresh